महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जाहीर: 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींसाठी मतदान व निकाल कधी? संपूर्ण वेळापत्रक

राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींसाठीच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. मतदान आणि निकालाचे संपूर्ण वेळापत्रक येथे पाहा.

A press conference featuring two speakers with a backdrop of white fabric and multiple microphones in front of them.
राज्य निवडणूक आयोगाने महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पहिल्या टप्प्याचे वेळापत्रक प्रसिद्ध केले.

महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या महत्त्वाच्या तारखा

राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींच्या मतदानाच्या तारखा निश्चित झाल्या आहेत. 2 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. त्याचा निकाल लगेच दुसऱ्या दिवशी 3 डिसेंबर रोजी लागेल. आज, 4 नोव्हेंबर पासून, आचारसंहिता त्वरित लागू करण्यात आली आहे.

मुदत संपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी निवडणुका

राज्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांची मुदत आता संपली आहे. यात 29 महापालिका, 32 जिल्हा परिषदा, 42 नगर पंचायती, 336 पंचायत समित्या आणि 246 नगरपालिकांचा समावेश आहे. या जागांसाठी निवडणुका घेतल्या जातील. पहिल्या टप्प्यात नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचे आयोजन केले आहे.

महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका वेळापत्रक

  • नामनिर्देशन पत्र: 10 नोव्हेंबर
  • अंतिम मुदत: 17 नोव्हेंबर
  • छाननी: 18 नोव्हेंबर
  • अर्ज माघारी घेण्याची तारीख: 21 नोव्हेंबर
  • निवडणूक चिन्ह वाटप: 26 नोव्हेेबर
  • मतदान: 2 डिसेंबर
  • निकाल: 3 डिसेंबर

महाराष्ट्रात एकूण मतदार संख्या किती?

निवडणुकांसाठी अंतिम मतदार यादी 31 ऑक्टोबरला प्रसिद्ध झाली आहे. त्यानुसारच मतदान प्रक्रिया पार पडेल. एकूण 1 कोटी 7 लाख 3 हजार 576 मतदार यात सहभागी होतील. यात 53 लाख 22 हजार 870 महिला मतदार असतील. या निवडणुकीसाठी राज्यात एकूण 13,000 कंट्रोल युनिट्स तयार करण्यात आले आहेत.

‘गुलाबी मतदान केंद्रा’वर लक्ष

मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाने 32 मोहिम (कॅम्पेन) बनवल्याची माहिती दिली. दिव्यांग मतदार, लहान बाळांसह महिला, आणि ज्येष्ठ नागरिकांना पहिल्यांदा मतदान करू दिले जाईल. तसेच, काही मतदान केंद्र ‘गुलाबी केंद्र’ म्हणून ओळखली जातील. या केंद्रांवर सर्व अधिकारी महिला असतील.

विभागनिहाय नगरपरिषद-नगरपंचायतींच्या निवडणुका

  • कोकण: 17
  • नाशिक: 49
  • पुणे: 60
  • संभाजीनगर: 52
  • अमरावती: 45
  • नागपूर: 55

उमेदवारांच्या खर्चात वाढ

यंदा निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांसाठी खर्च मर्यादा वाढवली आहे. हे नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीला लागू आहे. ‘अ’ वर्ग नगरपालिकांच्या अध्यक्षपदासाठी 15 लाखांची मर्यादा आहे. ‘क’ वर्ग नगरपालिकांसाठी 7 लाखांची खर्च मर्यादा निश्चित केली आहे.

मतदारांच्या सोयीसाठी नवीन ॲप

मतदारांच्या सोयीसाठी एक नवीन मोबाईल ॲप बनवण्यात आले आहे. दुबार मतदानासंदर्भात योग्य खबरदारी घेतली आहे. संभाव्य दुबार मतदारांच्या पुढे डबल स्टार (**) चे चिन्ह दाखवले आहे. ज्या मतदारांच्या पुढे डबल स्टार असेल, त्यांच्याकडून घोषणापत्र घेतले जाईल. यामुळे ते दुसरीकडे मतदान करणार नाहीत याची खात्री होईल.


Related Posts

महाराष्ट्र स्थानिक निवडणुका: नगरपरिषद आणि नगर पंचायत निवडणूक खर्चाच्या मर्यादेत वाढ, आता किती खर्च करता येईल?

राज्यातील 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. या निवडणुकांसाठी 2 डिसेंबरला मतदान होणार असून 3 डिसेंबरला निकाल लागेल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल राज्यातील स्थानिक स्वराज्य…

अधिक वाचा
निवडणूक जाहीर: दुबार मतदारांसाठी राज्य निवडणूक आयोगाने आणला ‘डबल स्टार’ तोडगा !

राज्य निवडणूक आयोगाने नगरपंचायत आणि नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. 2 डिसेंबर रोजी मतदान होईल, तर 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. दुबार मतदारांच्या समस्येवर आयोगाने विशेष तोडगा काढला…

अधिक वाचा

Leave a Reply

Discover more from ब्रिक्स टाईम्स

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading