चीनने झांग शेंगमिन यांना दुसरे सर्वात शक्तिशाली लष्करी पद दिले

चीनमधील केंद्रीय लष्करी आयोगाच्या अखत्यारीत भूदल, नौदल आणि वायुसेना येते. चीनचे राष्ट्रपती याचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. आता झांग शेंगमिन यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. हे चीनमधील दुसरे सर्वात शक्तिशाली पद मानले जाते. 67 वर्षांचे झांग हे चिनी राष्ट्रपतींच्या जवळचे मानले जातात.

झांग शेंगमिन, चीनचे नवीन लष्करी आयोग उपाध्यक्ष आणि पीएलए भ्रष्टाचार विरोधी प्रमुख.
झांग शेंगमिन, ज्यांच्याकडे आता चिनी सैन्यात दुसरे सर्वात शक्तिशाली पद आहे.

झांग शेंगमिन कोण आहेत?

चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी झांग शेंगमिन यांची केंद्रीय लष्करी आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. चीनमध्ये लष्करी आयोगाचे उपाध्यक्ष हे दुसरे सर्वात शक्तिशाली पद मानले जाते. झांग शेंगमिन हे पीपल्स लिबरेशन आर्मीमधील भ्रष्टाचार विरोधी मोहिमेचे प्रमुख आहेत.

साउथ चायना मॉर्निंग पोस्टनुसार कम्युनिस्ट पार्टीच्या चौथ्या अधिवेशनात झांग शेंगमिन यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. झांग यांच्याआधी हे वेइदोंग या पदावर कार्यरत होते. वेइदोंग यांना एकेकाळी जिनपिंग यांचे खास मानले जात होते. मात्र, भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर त्यांना पदावरून हटवण्यात आले.

झांग शेंगमिन कोण आहेत?

फेब्रुवारी 1958 मध्ये शानक्सी येथे जन्मलेले झांग शेंगमिन वयाच्या 20 व्या वर्षी चीनच्या सैन्यात सामील झाले. 2010 मध्ये त्यांनी एका भूकंप मदत दलाचे नेतृत्व केले, तेव्हा झांग यांचे नशीब बदलले. यानंतर त्यांची सतत बढती होत राहिली.

2017 मध्ये झांग यांची केंद्रीय लष्करी आयोगाच्या शिस्त तपासणी आयोगाचे सचिव म्हणून नियुक्ती झाली. याच वर्षी झांग यांची 19 व्या केंद्रीय समितीचे सदस्य म्हणूनही निवड झाली.

यानंतर झांग यांच्याकडे शिस्तपालन समितीची जबाबदारी सोपवण्यात आली. भ्रष्टाचार समितीचे अध्यक्ष असताना झांग यांनी चीनच्या लष्करातील 8 जनरल्सची नोकरी संपवली. चीनच्या लष्कराच्या उपाध्यक्षांची नोकरी देखील झांग यांच्यामुळेच गेली.

अणु आणि रॉकेटचा अनुभव

झांग शेंगमिन यांना अण्वस्त्रांपासून रॉकेटपर्यंतचा अनुभव आहे. त्यांनी सैन्यात दोन्ही विभागात काम केले आहे. चीनमध्ये लष्करी आयोगाचे जे उपाध्यक्ष असतात, त्यांनाच सैन्याचे संपूर्ण ऑपरेशन पाहावे लागते. वास्तविक पाहता, आयोगाचे अध्यक्ष राष्ट्रपती असतात.

राष्ट्रपतींवर संघटना ते सरकारपर्यंत अनेक जबाबदाऱ्या असतात. त्यामुळे सैन्याचे संपूर्ण ऑपरेशन लष्करी आयोगाच्या उपाध्यक्षांनाच पाहावे लागते. लष्करी आयोगाचे जे उपाध्यक्ष असतात, ते चीनच्या सर्वोच्च धोरणात्मक संस्था पोलित ब्युरोचे सदस्य देखील असतात.


Related Posts

यूएईचे उप अर्थमंत्री म्हणाले रशिया आणि अमिरातींमध्ये एक खास आर्थिक नाते आहे

SPIEF 2026 च्या निमित्ताने सेंट पीटर्सबर्गमध्ये यूएईचे उप अर्थमंत्री युनिस हाजी अल-खुरी यांनी सांगितले की रशिया आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यात विशेष आर्थिक संबंध आहेत जे नियमित नेतृत्व संवाद आणि…

अधिक वाचा
रशियाशी कथित संबंधांवरून EU ने तीन भारतीय कंपन्यांवर निर्बंध लादले

युरोपियन युनियनने (EU) कठोर पाऊल उचलत भारतातील तीन कंपन्यांवर बंदी घातली आहे. रशियासोबतचे कोणतेही तांत्रिक किंवा आर्थिक संबंध आता मान्य होणार नाहीत, असे EU ने स्पष्ट केल्यावर हा निर्णय आला…

अधिक वाचा

प्रतिक्रिया व्यक्त करा